मशिदींवरील ध्‍वनीप्रदूषण करणारे भोंगे काढून संबंधितांवर गुन्‍हे नोंद करा !

चोपडा (जिल्‍हा जळगाव) येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांची तहसीलदार आणि पोलीस यांच्‍याकडे मागणी !

निवेदन देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

जळगाव – ध्‍वनीप्रदूषणासंबंधीचा कायदा जुना आहे. आजपर्यंत या कायद्यान्‍वये शहरातील मशिदींवरील भोंग्‍यामुळे होणारे ध्‍वनीप्रदूषण रोखण्‍यासाठी कुठलीही कारवाई केलेली नाही. निवेदनात मशिदींवरील भोंगे हटवण्‍याविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या एका निकालाचा दाखलाही दिला आहे, तसेच शहरातील सर्व मशिदींवरील भोंग्‍यांमुळे होणारे ध्‍वनीप्रदूषण त्‍वरित थांबवून ते भोंगे काढावेत आणि अशा पद्धतीने गुन्‍हे करणार्‍या संबंधितांवर गुन्‍हे नोंद करावेत, अशा आशयाचे शहरातील हिंदुत्‍वनिष्‍ठ पक्ष, संघटना आणि गणेशोत्‍सव मंडळ यांच्‍या कार्यकर्त्‍यांनी दिलेले निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात अन् शहर पोलीस ठाण्‍याचे पोलीस उपनिरीक्षक घनश्‍याम तांबे यांनी स्‍वीकारले. महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या स्‍थानिक कार्यालयात निवेदन दिले आहे. निवेदनाची प्रत राज्‍यपाल, मुख्‍यमंत्री, जिल्‍हाधिकारी, स्‍थानिक आमदार, खासदार, मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे, पोलीस अधीक्षक आणि सकल हिंदु आघाडीचे संयोजक यांना देण्‍यात आली आहे.

शहरातील मशिदींवरील भोंग्‍यांद्वारे होणार्‍या ध्‍वनीप्रदूषणामुळे सर्वसामान्‍यांना त्रास होतो. अनेक वर्षांपासून वेळीअवेळी भल्‍या पहाटे होणार्‍या भोंग्‍यांच्‍या आवाजामुळे परिसरातील लहान मुले, विद्यार्थी, वयस्‍कर, तसेच आजारी आदींना शारीरिक त्रासांसह मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्रासदायक आवाजाने ग्रस्‍त असूनही हे प्रदूषण धार्मिक कारणांसाठी होत असल्‍याचा विचार करून सर्वधर्मसमभाव मानणार्‍यांनी ध्‍वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष केले होते; मात्र यावर्षी शहर पोलिसांनी ३० गणेशोत्‍सव मंडळांच्‍या पदाधिकार्‍यांवर रात्री १२ वाजल्‍यानंतर पारंपरिक वाद्ये वाजवून ध्‍वनीप्रदूषण केले; म्‍हणून अनेक कलमांखाली गुन्‍हे नोंद केले आहेत. (अन्‍य धर्मियांना मोकळीक आणि हिंदूंवर मात्र कारवाईचा बडगा उगारणे हा चोपडा शहर पोलिसांचा दुटप्‍पीपणाच होय ! – संपादक)

उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठ

निवेदनावर हिंदुत्‍वनिष्‍ठ सर्वश्री यशवंत चौधरी, अनिल वानखेडे, गजेंद्र जैस्‍वाल, नरेश महाजन, प्रेम घोगरे, नीलेश बारी, मोहित भावे, गौरव सोनार, जितेंद्र महाजन, योगेश बारी, संदीप चव्‍हाण, देवेंद्र बाविस्‍कर, मनोज विसावे, समाधान माळी, प्रथम शर्मा, अशोक शेटे, नितीन महानुभाव, रूपेश कासार, नीरज सोनवणे, गणेश विसावे, सागर चौधरी, शुभम माळी आदींच्‍या स्‍वाक्षर्‍या आहेत.

संपादकीय भूमिका :

  • धर्मरक्षणासाठी संघटित होणार्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांचे अभिनंदन !
  • मशिदीवरील ध्‍वनीप्रदूषण करणारे भोंगे पोलिसांना का दिसले नाहीत ? याविषयी ते सांगतील का ?