सर्वोच्च न्यायालयाने रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करणारी मागणी करणारी फेटाळली याचिका !
|
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने रामसेतु असलेल्या समुद्रातील काही किलोमीटर भागावर भिंत बांधण्याच्या मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्ते अशोक पांडे यांनी मागणी करतांना म्हटले हेते की, या माध्यमातून लोक रामसेतूचे दर्शन घेऊ शकतील. यासह रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणीही या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती.
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशु धूलिया यांच्या खंडपिठाने ही याचिका फेटाळली. खंडपिठाचे म्हणणे आहे की, हे एक प्रशासकीय सूत्र असून याचिकाकर्त्याने यासंदर्भात सरकारशी संपर्क साधला पाहिजे. याचिकाकर्ते पांडे यांनी त्यांच्या याचिकेला भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या रामसेतूशी संबंधित याचिकेला जोडण्याचीही मागणी केली होती, परंतु न्यायालयाने ती मागणीसुद्धा फेटाळली. डॉ. स्वामी यांनीही रामसेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याची मागणी करणारी याचिका काही वर्षांपूर्वी प्रविष्ट केली असून ती प्रलंबित आहे. केंद्रशासनाने या याचिकेवर म्हटले होते की, संस्कृती मंत्रालयामध्ये रामसेतूला ऐतिहासिक राष्ट्रीय वारसा घोषित करण्याची प्रक्रिया चालू आहे.