भक्तीसत्संगात १२ ज्योतिर्लिंगांची माहिती सांगितल्यावर भावजागृती होऊन गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे
१. ज्योतिर्लिंगांची माहिती सांगितल्यावर मनात आलेले विचार : ‘१६.२.२०२३ या दिवशी झालेल्या भक्तीसत्संगात १२ ज्योतिर्लिंगांची माहिती सांगितली होती. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि माझ्या मनात पुढील विचार आले.
अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चरण हीच १२ ज्योतिर्लिंगे आहेत.
आ. पार्वतीने कठोर साधना केली होती. मलाही गुरुदेवांच्या चरणांची प्राप्ती करण्यासाठी तळमळीने झोकून देऊन व्यष्टी आणि समष्टी साधना करायची आहे.’
२. सत्संगामध्ये शिवतत्त्व अनुभवण्यास सांगितले. तेव्हा माझा भाव जागृत झाला. माझ्या अंगावर शहारे आले आणि डोळ्यांतून अश्रू आले.
३. ‘आता कोणत्याही तीर्थयात्रेला जावे’, असे मला वाटत नाही; कारण ‘सर्व तीर्थे गुरूंच्या चरणांशी आहेत.’
गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
– सौ. शोभा माहुलकर, नागपूर (१६.२.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |