गृहमंत्र्यांच्या नावे स्थानांतराचे बनावट आदेश काढणार्या महंमद इलियास याला अटक !
विशेष कार्यकारी अधिकार्यांचे इमेल केले हॅक !
मुंबई – महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांचे इमेल हॅक करून आणि थेट गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीचा उपयोग करून स्थानांतराचे बनावट आदेश काढणार्या महंमद इलियास याला सायबर पोलिसांनी मिरज येथून अटक केली आहे.
महंमद याने महावितरण विभागातील ६ अधिकार्यांच्या स्थानांतराचे बनावट आदेश काढले असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. तो ‘बीई इलेक्ट्रिकल इंजिनीअर’ असून खासगी कंत्राटदार आहे. त्याने आदेश काढलेल्या अधिकार्यांकडून पैसे घेतले होते का ? याविषयी पोलीस चौकशी करत आहेत. गृहमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकार्यांप्रमाणे आरोपीने अन्य कोणत्या अधिकार्यांचे इमेल हॅक केले नाहीत ना ? याविषयीही पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाअशांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! |