गुरूंच्या संकल्पाप्रमाणे नामजपादी उपाय नियमितपणे पूर्ण करून गुरूंची कृपा भावाच्या स्तरावर अनुभवणे आवश्यक असल्याचे सौ. सुप्रिया माथूर यांनी सांगणे
१. ‘पितृपक्षात त्रास वाढून साधनेची घडी विस्कटेल’, अशी भीती वाटत असल्याचे व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगणे
‘आता पितृपक्ष चालू होणार आहे. त्या दृष्टीने २५.९.२०२३ या दिवशी मी सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४० वर्षे) यांना व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितले, ‘‘ताई आता माझे थोडे प्रयत्न होत आहेत आणि आता पितृपक्ष चालू झाला, तर परत मला आध्यात्मिक त्रास होऊन माझी साधनेची घडी विस्कटेल’, असा भीतीचा विचार माझ्या मनात येत आहे.’’ यावर ताईने मला पुढील दृष्टीकोन दिला.
२. ‘गुरूंच्या संकल्पाप्रमाणे सांगितलेले उपाय नियमितपणे पूर्ण केले, तर देवतांच्या संरक्षककवचामुळे साधकांचे रक्षण होईल’, ही श्रद्धा उणी पडत असल्याचे सौ. सुप्रिया माथूर यांनी सांगणे
‘‘आपल्याला त्रास होऊन साधनेची घडी विस्कटेल’, अशी भीती वाटणे, म्हणजे गुरूंवरील श्रद्धेत उणे पडणे होय. गुरूंनी आपल्याला क्रियमाण दिले आहे, ते योग्य तर्हेने वापरायला हवे. गुरूंचा संकल्प आहे, ‘त्रासावर मात करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे उपाय शिस्तबद्धतेने केले; प्रतिदिन पूर्ण केले, तर देवतांच्या चैतन्याचे संरक्षककवच आपल्याभोवती असणारच आहे. हे सर्व भावाच्या स्तरावर अनुभवायला आपण उणे पडतो; म्हणून आपल्या मनात असे विचार येतात.’’
‘प.पू. डॉक्टर, तुमच्या कृपेने ताईने हे मार्गदर्शन केले आहे. त्याचा लाभ करून घेऊन या काळातही तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न आम्हाला श्रद्धेने करता येवू देत’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’
– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०२३)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |