कर्णावती (गुजरात) येथील शाळेने हिंदु मुलांकडून करून घेतले नमाजपठण !
|
कर्णावती (गुजरात) – येथील एका शाळेने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात हिंदु मुलांकडून नमाजपठण करून घेतले. या मुलांना जाळीची टोपी आणि कुर्ता-पायजमाही घालण्यास सांगण्यात आले होते. या कार्यक्रमाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर मुलांच्या संतप्त पालकांनी निदर्शने केली.
Hindu right-wing activists staged a protest on Tuesday and the Gujarat government ordered a probe after Hindu students were allegedly asked to perform namaz as part of an awareness program at a private school here.https://t.co/WK8v7FNyGD
— HindutvaWatch (@HindutvaWatchIn) October 4, 2023
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, कर्णावतीमधील घाटलोडिया येथील ‘कॅलोरेक्स स्कूल’मध्ये २९ सप्टेंबर या दिवशी ईदच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली लहान हिंदु विद्यार्थ्यांना नमाजचे कपडे घालायला लावण्यात आले. या वेळी त्यांना नमाजपठण करण्यास शिकवण्यात आले. हा संपूर्ण कार्यक्रम मुलांच्या पालकांच्या अनुमतीविना पार पडला. हिंदु संघटना आणि पालक यांनी या घटनेच्या विरोधात शाळेत निदर्शने केली अन् मुख्याध्यापकाच्या त्यागपत्राची मागणी केली. मुलांच्या पालकांनी त्यांच्या मुलांची नावे शाळेतून काढण्याविषयी विचार चालवला आहे. कर्णावतीचे जिल्हा शिक्षण अधिकारी रोहित चौधरी यांनी या प्रकरणी शाळेला नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे. वाढता विरोध पहाता शाळेने या प्रकरणी लिखित क्षमापत्र जारी केले आहे.
संपादकीय भूमिकायाऐवजी जर एखाद्या शाळेतील मुसलमान अथवा ख्रिस्ती विद्यार्थ्यांना हिंदु धर्मानुसार उपासना करण्यास सांगण्यात आले असते, तर एव्हाना देशभरात ‘शिक्षणाचे भगवेकरण’, ‘लोकशाहीची हत्या’, ‘अल्पसंख्यांकांवरील अरिष्ट’ अशा प्रकारे आरोळी ठोकत शाळेला वाळीत टाकण्याची धमकी दिली गेली असती, हे जाणा ! |