उत्तरप्रदेशातील रामपूर आणि श्रावस्ती येथे ८ गोतस्करांना अटक !
चकमकीनंतर पोलिसांनी केली कारवाई
रामपूर (उत्तरप्रदेश) – रामपूर आणि श्रावस्ती येथे गोतस्करांना पकडतांना झालेल्या चकमकींमध्ये गोतस्कर घायाळ झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
#एसपी_रामपुर के निर्देशन में जनपद रामपुर में अपराध एवं अपराधियों के विरूद्ध चलाये जा रहे अभियान के दौरान थाना टांडा व थाना स्वार क्षेत्रान्तर्गत गौतस्करों के साथ हुई पुलिस मुठभेड़ में 04 शातिर गौतस्कर घायल/गिरफ्तार ।#UPPolice #UPPInNews #RampurPoliceInNews pic.twitter.com/knE0J0YNVR
— Rampur police (@rampurpolice) October 5, 2023
१. रामपूर येथे झालेल्या कारवाईत पोलिसांनी ४ गोतस्करांना घेरले होते. त्यांनी येथे अमानुषपणे गोवंशियांना बांधून ठेवले होते. पोलिसांनी गोतस्करांना अटक करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. (पोलिसांवर गोळीबार करण्याइतपत उद्दाम झालेले गोतस्कर ! – संपादक) त्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात फहीम आणि सलीम यांच्या पायाला गोळ्या लागल्या; मात्र अन्य दोघे पळून गेले. या चकमकीत एक पोलीसही घायाळ झाला. पोलिसांनी येथून एक गोवंश, १ चारचाकी, १ पिस्तूल, ७ काडसुते जप्त केली.
२. श्रावस्ती येथे झालेल्या चकमकीनंतर ६ गोतस्करांना अटक केली. यातील ५ गोतस्करांना गोळ्या लागल्याने ते घायाळ झाले होते. त्यांच्याकडून ४ गोवंश, ५ पिस्तूल, चाकू आदी जप्त करण्यात आले.