हिंदी चित्रपटसृष्टीत स्त्रीच्या गुणवत्तेपेक्षा तिच्या शरिराला अधिक महत्त्व दिले जाते ! – अभिनेत्री पायल घोष
मुंबई – अभिनेत्री पायल घोष यांनी सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट प्रसारित केली आहे. यात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर टीका करत दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे कौतुक केले आहे. पायल घोष यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, धन्यवाद देवा, मला दक्षिण चित्रपटसृष्टीद्वारे पदार्पण करण्यास दिले. जर मी हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे पदार्पण केले असते, तर त्यापूर्वीच माझे कपड उतरवले गेले असते; कारण तेथे गुणवत्तेपेक्षा स्त्रीच्या शरिराला अधिक महत्त्व दिले जाते.’ सध्या ही पोस्ट सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
Thank god, I got launched in South Film Industry, if I would have got launched in #Bollywood they would have removed my clothes to present me, cos they use female bodies more than their creativity 😔
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) October 1, 2023
संपादकीय भूमिकाहिंदी चित्रपटसृष्टीचे हे वास्तव आज जगाला ठाऊक आहे. अशी चित्रपटसृष्टी समाजामध्ये कधीतरी नैतिकता निर्माण करण्यासाठी चित्रपटांद्वारे प्रबोधन करू शकेल का ? |