गोव्यात वेश्याव्यवसाय आणि दलाल यांची प्रतिदिन २ कोटी रुपयांची उलाढाल !
पणजी, ४ ऑक्टोबर (वार्ता.) : गोव्यात वेश्याव्यवसाय आणि दलाल यांची प्रतिदिन अडीच कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. अनैतिक मानवी तस्करीच्या प्रकरणी पीडितांचे पुनर्वसन करणार्या ‘अर्ज’ संस्थेचे प्रमुख अरुण पांडे यांनी ही माहिती दिली.
— Arun Pandey (@arunpandeygoa) October 4, 2023
(सौजन्य : Goa 365 TV)
अरुण पांडे यांनी सांगितले की,
१. गोव्यात अनैतिक मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात चालू आहे. परराज्यातून युवतींना गोव्यात आणून त्यांना बळजोरीने वेश्याव्यवसायात ढकलले जात आहे. अशा मुलींच्या जिवावर दलाल कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहेत. असे करणार्या दलालांची साखळीच आहे. अशा दलालांकडे आताच्या घडीला ५ सहस्र युवती आहेत आणि यांपैकी प्रतिदिन किमान २ सहस्र युवतींकडून धंदा करून घेतला जातो.
Persons buying Sex should be called "Sex Offender" & not "Client"!
It is they who create DEMAND, and perpetuate trafficking of girls for commercial sexual exploitation! pic.twitter.com/pqS5RFjIT2
— Arun Pandey (@arunpandeygoa) October 4, 2023
२. हे दलाल एका युवतीसाठी ५ सहस्र रुपयांपासून २५ सहस्र रुपये ग्राहकाकडून घेतात. एका युवतीसाठी १० सहस्र रुपये असा व्यवहार असल्यास ही उलाढाल २ कोटी रुपयांवर पोचते. पोलिसांनी केलेल्या कारवाईत कह्यात घेण्यात आलेल्या दलालांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
Rehabilitation & Compensation to victims are key to prevent re-trafficking. Unfortunately, we have failed to provide both to the victims after their Exit from Commercial Sexual Exploitation! pic.twitter.com/4K99Wm5LMg
— Arun Pandey (@arunpandeygoa) October 4, 2023
३. वेश्याव्यवसायासाठी सर्वाधिक युवती महाराष्ट्रातून आणल्या जातात. त्यानंतर मिझोराम आणि इतर राज्यांचा क्रमांक लागतो. वेश्याव्यवसायात गोव्यातील महिलांचे प्रमाण ७ टक्के आहे. युवती किंवा महिला एकदा वेश्याव्यवसायात उतरल्यानंतर त्या वाईट चक्रातून त्यांची सुटका होणे पुष्कळ कठीण असते. पोलिसांनी कारवाई करून त्यांची सुटका केल्यास दलाल पुन्हा त्यांना जाळ्यात ओढतात. जोपर्यंत त्यांचे पुनर्वसन करून त्यांना स्वावलंबी बनवले जाणार नाही, तोपर्यंत या महिला त्या चक्रातून बाहेर पडणे कठीण आहे.
Globally, Sex Trafficking is shifting from Offline to Online!
Our present laws do not have necessary provisions to address Online Commercial Sexual Exploitation! pic.twitter.com/hy8CMIBhgq
— Arun Pandey (@arunpandeygoa) October 3, 2023
Government will fight sex trafficking: CM
संपादकीय भूमिका
|