…आय.एस्.आय., चीन, इतर विघटनवादी आणि आतंकवादी यांच्या हातात आयती लाठी का द्यावी ?
आपली प्रसिद्धीमाध्यमे, सरकार आणि आपण सर्व भारतीय अमेरिका, इंग्लड अन् कॅनडा, तसेच इतरत्र असलेले आपल्या देशाचे विविध दूतावास यांच्यावर आक्रमण करणारे दंगलखोर किंवा आतंकवादी यांना ‘खलिस्तानी’ म्हणू नये. सर्वप्रथम ‘खलिस्तान’ असे काहीही नाही. दुसरे म्हणजे त्यांपैकी बहुतांश हे अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड येथील नागरिक आहेत. बहुतेक जणांचा जन्मच तिथे झाला आहे. त्यामुळे त्यांचा उल्लेख करतांना आपण त्यांना ‘त्यांच्या राष्ट्रांच्या नावानुसार अमेरिकी किंवा कॅनेडाचे नागरिक आपल्या दूतावासांवर आक्रमण करत आहेत’, असा उल्लेख करू शकतो. वस्तूस्थिती म्हणजे ते दंगलखोर शीख आहेत, या अनुषंगाने आहे. त्यामुळे हा प्रश्न त्या देशांचा आहे. जर अमेरिका आणि इंग्लंड येथे रहाणार्या नागरिकांना खलिस्तान हवे आहे, तर त्या देशातील संसदेच्या प्रमुखांनी हा प्रश्न हाताळला पाहिजे. त्यामुळे आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ‘त्या लोकांना त्यांच्या येथे खलिस्तान द्यावे’, अशी विनंती करू शकतो. याचप्रमाणे ट्रुडो आणि त्यांच्या मंत्रीमंडळालाही तशी विनंती करू शकतो. आपल्या अधिकृत भाषेमधून ‘खलिस्तान’ हा शब्द वगळला पाहिजे. जर भारतियांना आपल्या देशाकडून काही हवे असेल, तर त्यांनी भारतात यावे आणि त्यांनी वैधपणे अन् लोकशाही पद्धतीने त्यांची मागणी करावी. या लोकांना पाठिंबा देणार्या आय.एस्.आय. (पाकची गुप्तचर यंत्रणा), चीन, इतर विघटनवादी आणि आतंकवादी यांच्या हातात आयती लाठी का द्यावी ? आपण त्यांचा उल्लेख केवळ ‘विघटनवादी’ आणि ‘आतंकवादी’, असा केला पाहिजे. त्यामुळे अगदी अलीकडच्या घटनेमध्ये ‘कॅनडामधील आतंकवाद्यांनी तेथील भारतीय दूतावासावर आक्रमण केले’, असा उल्लेख करायला हवा. आपले नागरिक, म्हणजेच कॅनडाचे नागरिक भारतीय दूतावास आणि भारतियांची मालमत्ता यांवर आक्रमण का करत आहेत ? याविषयीची नोंद कॅनडा सरकारने ठेवायला हवी.
(साभार : सामाजिक माध्यम)