कु. वैष्‍णवी काळे हिचा शासकीय बुद्धीबळ स्‍पर्धेत तृतीय क्रमांक !

कु. वैष्‍णवी काळे

कोल्‍हापूर – येथील ‘राजमाता जिजाबाई हायस्‍कूल’ची इयत्ता १० वीची विद्यार्थिनी कु. वैष्‍णवी बाळासाहेब काळे (वय १५ वर्षे) हिने कोल्‍हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समिती आणि जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्‍हापूर यांचे संयुक्‍त विद्यमाने आयोजित महापालिका स्‍तर शासकीय बुद्धीबळ स्‍पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला आहे. यामुळे आता कु. वैष्‍णवीची रत्नागिरी इथे होणार्‍या विभागीय स्‍तर शासकीय बुद्धीबळ स्‍पर्धेसाठी निवड झाली आहे. कु. वैष्‍णवी ही कोल्‍हापूर येथील स्‍थानिक वृत्तवाहिनी ‘एस्. न्‍यूज’चे कार्यकारी संपादक श्री. बाळासाहेब काळे यांची सुकन्‍या आहे.