वाघनखे भावी पिढीला शिवप्रतापाची प्रेरणा देतील ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
शिवरायांनी वापरलेली वाघनखे आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांसारखी दूरदृष्टी असलेला दुसरा राजा भारतात झाला नाही. शिवछत्रपतींची ही वाघनखे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतातील समस्त शिवप्रेमींसाठी एकप्रकारे ‘शिवदर्शन’ ठरतील. ही वाघनखे भावी पिढीला शिवप्रतापाची प्रेरणा देतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त वाघनखे भारतात आणण्याचा संकल्प राज्य सरकारने केला होता. त्यानुसार वाघनखे आणण्याचा सामंजस्य करार आज (ता. 4) झाला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.सविस्तर वाचा https://t.co/dxPdHZCpta pic.twitter.com/RsgErf45Sl
— Sarkarnama (@SarkarnamaNews) October 4, 2023
छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे ब्रिटनमधून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर ३ ऑक्टोबर या दिवशी लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम’मध्ये स्वाक्षरी झाली. या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यामध्ये वाघनखांची भूमिका महत्त्वाची आहे. ही वाघनखे म्हणजे गनिमी काव्याचे उत्तम उदाहरण होय. वर्ष २०२३ ते २०२६ या कालावधीसाठी ही वाघनखे भारतात रहातील. महाराष्ट्रात सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई येथील वस्तूसंग्रहालयांमध्ये ही वाघनखे पहाण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. वाघनखे आणणे हा अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे.’’ – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री |