पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ‘लेझर’ प्रकाशामुळे २३ वर्षीय तरुणाची दृष्टी अधू झाली !
‘लेझर बीम’वर बंदी आणावी किंवा त्यावर निर्बंध घालावेत, अशी पत्रकार परिषदेमध्ये मागणी !
पुणे – श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनीक्षेपकातील (डॉल्बी ध्वनीक्षेपण यंत्रणा) ‘लेझर लाईट’मुळे (विद्युत् चुंबकीय उत्सर्जनामुळे निर्माण झालेला प्रकाश) पुण्यातील अनिकेत शिगवण या २३ वर्षीय तरुणाच्या डोळ्यातील ‘रेटिना’ला (डोळ्यातील मधला भाग) दुखापत झाली. त्यामुळे त्याची अनुमाने ७० टक्के दृष्टी अधू झाल्याची माहिती ‘दूधभाते नेत्र रुग्णालया’चे आधुनिक वैद्य अनिल दूधभाते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. अनिकेतसारख्या घटना अनेक ठिकाणी घडल्या असल्याचे समोर येत आहे. राज्य सरकारने या ‘लेझर बीम’वर बंदी आणावी किंवा त्यावर निर्बंध घालावेत, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही आधुनिक वैद्य दूधभाते यांनी सांगितले.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान साऊंड वरिल लेझर लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या लेझर लाईट मुळे जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या डोळ्याच्या रेटिनाला गंभीर इजा होऊन त्याच्या काही अंशी अंधत्व आले आहे. अशी माहिती सिंहगड रोडवरील दूधभाते नेत्रालयाचे सुप्रसिद्ध… pic.twitter.com/TP6PWItO9t
— Civicmirrorofficial (@civicmirrorpune) October 3, 2023
वैद्य दूधभाते म्हणाले, ‘‘यंदाच्या वर्षी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डीजे (डॉल्बी यंत्रणा) आणि ‘लेझर लाईट’चा वापर करण्यात आला.
ही ‘लेझर लाईट’ ५ मिलीवॅटपेक्षा अधिक होती. ती मनुष्याच्या डोळ्यांवर १० सेकंदासाठी जरी प्रकाशित झाली, तरी त्याचा ‘रेटिना’वर परिणाम होऊ शकतो. तसाच प्रकार अनिकेतवर झाला. त्यामुळे त्याच्या एका डोळ्यातील ‘रेटिना बर्ग’ (जळणे) होऊन त्याची दृष्टी अधू झाली.