बिहारनंतर आता झारखंड सरकारही जातीनिहाय जनगणना जारी करण्याची शक्यता !
रांची (झारखंड) – बिहार सरकारने जातीनिहाय जनगणनेचे आकडे जाहीर केल्यानंतर आता झारखंड राज्यातही त्या दिशेने पावले पडत आहेत, असे सांगितले जात आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन याचा प्रस्ताव विधानसभेत मांडू शकतात, असे काही राजकीय नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
‘ऑल झारखंड स्टूडेंट्स युनियन’ या राजकीय पक्षाचे प्रमुख आणि आमदार सुदेश महतो यांनी अशा जनगणनेची मागणी केली असून झारखंड सरकार आणि काँग्रेस यांनी ही जनगणना जारी करून दाखवावी, असे आव्हान दिले आहे.
बिहार के बाद अब झारखंड में जातिगत जनगणना? विधानसभा में प्रस्ताव पारित कर सकती है CM हेमंत सोरेन की सरकार, आजसू नेता बोले – यहाँ तो कोई दिक्कत नहीं…#Jharkhand #HemantSorenhttps://t.co/p76Cfd56fa
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 3, 2023
दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी आमदार आयपी सिंह यांनी ट्विटरवरून दावा केला आहे की, झारखंड सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला असून लवकरच कॅबिनेटमध्ये यासंदर्भातील प्रस्ताव पारित केला जाणार आहे.
झारखंडमध्ये सत्तेत असलेले झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी वर्ष २०२१ मध्ये गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जातीनिहाय जनगणनेची मागणी केली होती. तसेच विधानसभेतही ती लागू करण्याची माहितीही सरकारने याआधी दिली होती.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारच्या जनगणनेच्या माध्यमातून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे कुटील षड्यंत्र रचण्यात आले आहे. हिंदूंच्या विरोधातील हिंदुद्वेष्ट्या राजकीय पक्षांचे हे कटकारस्थान उलथवून लावण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच एकमेव पर्याय आहे ! |