हिंदवी स्वराज्याच्या पराक्रमाचा इतिहास महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोचणार !
राज्यशासन ३ भाषांमध्ये पुस्तिका प्रकाशित करणार !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर मावळे यांनी पराक्रम गाजवून स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचा इतिहास मराठी, हिंदी आणि इंग्रजी या ३ भाषांमध्ये पुस्तिका स्वरूपात प्रसिद्ध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. ही पुस्तिका ‘कॉफीटेबल बूक’ (वाचण्यास सुलभ आणि छोट्या स्वरूपातील पुस्तिका) स्वरूपाची असेल. प्रत्येक भाषेच्या पुस्तिकेसाठी २० लाख रुपये याप्रमाणे ६० लाख रुपयांचे प्रावधान राज्यशासनाकडून करण्यात आले आहे. ४ ऑक्टोबर या दिवशी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने याविषयीचा शासन आदेश काढला आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाचे वर्ष या निमित्ताने हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. हे पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोचण्याच्या दृष्टीने राज्यशासन प्रयत्न करणार आहे.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्र शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! |