पाचगाव (जिल्हा नागूपर) येथे रिसॉर्टवरील धाडीत अश्लील नृत्य करणार्या १३ तरुणी कह्यात !
संस्कृती आणि नैतिकता यांचे हनन करणार्या अशा रिसॉर्टवर बंदीच घालायला हवी !
नागपूर – जिल्ह्यातील कुही तालुक्यातील पाचगाव येथील सिल्वर लेक फार्म रिसॉर्टवर मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १३ तरुणी तोकड्या कपड्यांत अश्लील नृत्य करत होत्या. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रिसॉर्टवर धाड घालून १३ तरुणींना कह्यात घेतले आहे, तर २४ मद्यधुंदांना अटक करण्यात आली. अश्लील नृत्य करणार्या तरुणींवर जवळपास २४ ग्राहक पैसे उधळून नाचत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी डीजे (‘डीजे’ (डिस्क जॉकी) एक व्यक्ती वेगवेगळ्या संगीतांचे मिश्रण करून त्याचे प्रसारण करते.) बंद करून विदेशी मद्यांसह ४८ लाख ४८ सहस्र रुपयांचा माल जप्त केला.
नागपूर!
कुही तालुक्यातील पाचगावमध्ये असलेल्या सिल्वर लेक फार्म रिसॉर्टवर एका रंगारंग पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 13 तरुणी तोकड्या कपड्यात अश्लील नृत्य करीत होत्या. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रिसॉर्टवर छापा घातला. 1/6
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) October 3, 2023
या रिसॉर्टचे मालकी हक्क राजबापू मुथईया दुर्गे यांच्याकडे आहेत, तर विपीन यशवंत अलोने हे व्यवस्थापक आहेत. आरोपी भूपेंद्र उपाख्य माँटी अणे हा तरुणींना येथे अश्लील नृत्य करण्यासाठी करार पद्धतीने आणतो. (अश्लील नृत्यासाठी पूरक ठरणार्या अशा संबंधितांवर कठोर कारवाई कधी होणार ? – संपादक) गेल्या अनेक दिवसांपासून येथे जवळपास २० तरुणी रात्रीच्या मेजवानीत तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करतात, तर ग्राहक त्यांच्यावर पैसे उधळतात.
|