हत्येच्या गुन्ह्यातील पसार आरोपीस ३६ वर्षांनी पकडले !
आरोपींना पकडण्यास एवढी वर्षे का लागतात ? याचा अभ्यास पोलीस करतील का ?
कराड – उंब्रज पोलीस ठाण्याअंतर्गत वर्ष १९८७ मध्ये हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या हत्येच्या गुन्ह्यातील पसार आरोपी लाला सिद्धाम तेली याला ३६ वर्षांनंतर पोलिसांनी पकडले आहे. (याला पोलिसांची कार्यक्षमता म्हणायचे का ? – संपादक) मनव या गावातील बाळू सरगर, दत्तू सरगर आणि सहकारी यांनी गावातीलच भीमराव सिद्धाम तेली यांची वर्ष १९८३ मध्ये हत्या केली होती. या हत्येच्या कारणावरून लाला तेली आणि त्यांचे सहकारी यांनी दत्तू ज्ञानू यालमारे यांचा कोयता, कुर्हाड यांसारख्या शस्त्रांनी हत्या केली होती. या गुन्ह्याची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली होती. यातील आरोपी लाला तेली ३६ वर्षे पसार होते. गणेशोत्सवानिमित्त आरोपी येणार असल्याचे कळल्यावर पोलिसांनी त्यास अटक केली.