लोणावळा (जिल्हा पुणे) येथे पर्यटक अल्पवयीन मुलींचे अपहरण करून सामूहिक बलात्कार !
पोलिसांकडून सामूहिक बलात्कार करणार्या टोळीवर कारवाई !
लोणावळा (जिल्हा पुणे) – लोणावळा येथे एका टोळीने पर्यटक अल्पवयीन मुलींचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. या टोळीमध्ये १० गुन्हेगारांचा सहभाग आहे. या प्रकरणी बेताब पवार, मंदा पवार, संजना पवार, बबलू पवार, अर्चना पवार, मोनिका पवार यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे. यातील २ आरोपी अल्पवयीन आहेत. या प्रकरणातील काही आरोपींच्या नावे आधीही काही गुन्ह्यांची नोंद आहे. (या गुन्ह्यांच्या प्रकरणी संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली नाही का ? – संपादक) पोलीस उर्वरित आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
प्रसिद्ध पर्यटनस्थळ लोणावळा येथे आधी पर्यटक मुलींचं अपहरण, मग सामूहिक बलात्कार, पोलिसांकडून मोठी कारवाईhttps://t.co/tqKV7alBZf#Lonavala #PunePolice #PuneCrime
— LoksattaLive (@LoksattaLive) October 1, 2023
पहिल्या घटनेत लोणावळा रेल्वेस्थानक परिसरात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अपहरण केले आणि हनुमान टेकडी परिसरातील एका घरात साखळीने बांधून ठेवत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोणावळा शहर परिसरात घडलेल्या आणखी एका घटनेत उत्तरप्रदेशातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पीडित मुलगी लोणावळा रेल्वेस्थानक परिसरात थांबली असतांना तिला पळवून नेण्यात आले, तसेच मारहाण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
संपादकीय भूमिका :छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा घटना घडणे लज्जास्पद आहे ! यातून पोलिसांचा गुन्हेगारांना काहीच धाक उरला नाही, हे सिद्ध होते. |