सिंधुदुर्ग : गौतमी पाटील यांचे जिल्ह्यातील नृत्याचे कार्यक्रम रहित
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध स्तरांवर झालेल्या विरोधाचा परिणाम
सिंधुदुर्ग : ‘देवगड अम्युझमेंट सेंटर’चे धैर्यशील पाटील आणि ‘ड्रायम् इव्हेंट्स’ यांच्या वतीने ‘कॉमेडीचे सुपरस्टार’ अन् ‘गौतमी पाटील डी.जे. डान्स शो’ या २ कार्यक्रमांचे ७ आणि ८ ऑक्टोबर या दिवशी कणकवली अन् कुडाळ येथे आयोजन करण्यात आले होते. नृत्यांगना गौतमी पाटील यांचे महाराष्ट्र राज्यातील यापूर्वीचे काही कार्यक्रम वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्यांच्या कार्यक्रमांना विविध स्तरांवर विरोध होऊ लागला. परिणामी आयोजकांनी गौतमी पाटील यांचे कार्यक्रम रहित करत असून केवळ ‘कॉमेडीचे सुपरस्टार’ हा कार्यक्रम नियोजनानुसार होईल, असे घोषित केले आहे.
नृत्यांगणा गौतमी पाटीलला कोल्हापूरनंतर सिंधुदुर्गात" नो एंट्री", ठरलेले कार्यक्रम रद्द, कारण समोर…https://t.co/zA0JjX5Axj#GautamiPatil #Sindhudurg #Konkan
— Maharashtra Times (@mataonline) October 3, 2023
(सौजन्य : Kokansad Live)
याविषयी कार्यक्रमांचे आयोजक देवगड अम्युझमेंट सेंटरचे धैर्यशील पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘गौतमी पाटील यांचे कुडाळ आणि कणकवली येथे आयोजित नृत्याचे कार्यक्रम काही कारणांमुळे रहित करण्यात आले आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यावी.’
(स्त्रोत : devgad amusement centre)
आयोजकांनी काही कारणांमुळे कार्यक्रम रहित केल्याचे म्हटले असले, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांकडून या अनैतिक कार्यक्रमांना झालेल्या विरोधामुळेच हे कार्यक्रम रहित करावे लागले, अशी चर्चा जिल्ह्यात चालू होती.
सविस्तर वृत्त वाचा –
♦ गौतमी पाटील यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढता विरोध !
https://sanatanprabhat.org/marathi/724643.html