सनातन धर्म म्‍हणजेच ईश्‍वर होय !

श्री. श्रीराम खेडेकर

नको राग नको कुणाचा हेवा ।
शिकायचे अध्‍यात्‍म हाच ठेवा ॥
सनातनची कीर्ती जगी करूया ।
हेचि दान आम्‍हा देगा देवा ॥ १ ॥

आहे जगण्‍यापुरती साधनसंपदा ।
आणखी कशाला हवी धनसंपदा ॥
इथे कुणीही कुणाचे नसतांना ।
आलो तसा जाणार शरिराविना ॥ २ ॥

सनातन धर्म म्‍हणजेच ईश्‍वर होय ।
शिकून घेऊया आलो जन्‍माला ॥
तू कोण आलास सनातनला संपवायला ।
तूच जाशील रसातळाला ॥ ३ ॥

मूर्खाचे पाऊल पडते विनाशाकडे ।
तरीपण लक्ष शिव्‍या देण्‍याकडे ॥
सजीवपणाचा अहंकार का ।
निर्जीव दगड उपयोगी आला ॥ ४ ॥

सनातनचे कार्य करणारे वीर गडे ।
बाकी नाहक बडबडणारे गधडे ।
पाप्‍यांनो पाप कशाला वाढवूया ।
सद़्‍गुरु सत्‍संगाची कास धरूया ॥ ५ ॥

– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा. (१.१०.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक