मुंबईतील ‘शिवसदन’ सोसायटीचा इंग्रजी भाषेतील फलक मराठी भाषेत लावला !
|
मुलुंड – तृप्ती देवरूखकर यांना घर नाकारण्यात आलेल्या ‘शिवसदन’ सोसायटीचा इंग्रजी भाषेतील फलक मराठीप्रेमींच्या सूचनेनंतर पालटून मराठी भाषेत लावण्यात आला. यासाठीची मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश गायकवाड यांनी केली होती. या परिसरात असणार्या गुजराती भाषेतील फलकांवर त्यांनी काळ्या अक्षरात मराठी भाषेत निषेधाचा मजकूर लिहिला.
राकेश गायकवाड म्हणाले, ‘‘मराठी भाषेसाठी प्रत्येक मराठी माणसाने आवाज उठवला पाहिजे. मुंबईमध्ये जाणूनबुजून गुजराती भाषेतील फलक लावले जातात. त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो.’’
संपादकीय भूमिकामराठीप्रेमींनी केवळ एक फलक मराठी भाषेत लागला; म्हणून न थांबता मराठीबहुल असणार्या महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणचे फलक मराठी भाषेत लावण्यात येईपर्यंत संबंधितांचा पाठपुरावा घ्यावा ! |