बीड येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहारात सापडल्या अळ्या !
पोषण आहारासारख्या आरोग्याशी संबंधित कृतीही नीट होत नाहीत, हे दुर्दैवी ! अशांना कठोर शिक्षाच करायला हवी !
बीड – गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना देण्यात आलेल्या खिचडीत अळ्या सापडल्याची तक्रार केली आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मुख्याध्यापक आणि खिचडी बनवणारे यांचे वैयक्तिक संबंध चांगले असल्याने मुख्याध्यापक अन् शिक्षक यांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या शाळेमध्ये आसपासच्या अनेक गावांतून मुले शिकण्यासाठी येतात. त्यांना अशा प्रकारचे अन्न दिल्याने विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे या प्रकाराकडे वेळीच लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (पोषण आहारातील तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे मुख्याध्यापक आणि शिक्षक मुलांच्या सर्वांगिण हिताचा विचार कधी करतील का ? असा प्रश्न कुणाला पडल्यास चूक ते काय ? – संपादक)