प्रत्येकानेच घरच्या घरी भाजीपाला पिकवणे आवश्यक

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४२

घरच्या घरी भाजीपाला

‘आजकाल पेठेत मिळणार्‍या भाजीपाल्यावर पुष्कळ विषारी किटकनाशकांची फवारणी केलेली असते. यातील काही किटकनाशके आपण जी भाजी खातो, त्या भाजीच्या पेशीपेशींत मुरलेली असतात. ही विषारी द्रव्ये भाजी कितीही वेळा धुतली, तरी निघून जात नाहीत आणि भाजी खाल्ल्यावर ती आपल्या पोटात जातात.

वैद्य मेघराज पराडकर

असा भाजीपाला खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते. किटकनाशकांचा अती वापर हे कर्करोगासारख्या गंभीर विकारांना कारण ठरू शकते, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रत्येकाने निदान स्वतःपुरता भाजीपाला घरच्या घरी पिकवणे आवश्यक बनले आहे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०२३)


लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका