समृद्धी महामार्गाच्या पथकर नाक्यावरील परप्रांतीय कर्मचार्यांना मनसैनिकांकडून मारहाण !
छत्रपती संभाजीनगर – येथील ‘समृद्धी’ महामार्गावरील पथकर नाक्यावरील परप्रांतीय कर्मचार्याला मनसैनिकांनी मारहाण केली आहे. पथकर नाक्यावरील मराठी कर्मचार्यांना परप्रांतीय कर्मचारी धमकावत असल्याचा आरोप करण्यात येत आला. त्यामुळेच मनसैनिकांनी परप्रांतीय कर्मचार्याला चोप दिला. अनेक दिवसांपासून या पथकर नाक्यावर स्थानिक कर्मचार्यांचे वेतन थकल्याने वाद होत आहेत. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव पथकर नाक्यावर हा प्रकार घडला आहे.
या प्रकरणाच्या विरोधात मनसेच्या नाशिक शहराध्यक्षा अक्षरा घोडके यांनी परप्रांतीय कर्मचार्यांना मारहाण केली. पथकर नाका बंद केला. येथे कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने महामार्गावर वाहतुकीची झालेली कोंडी पोलिसांनी सोडवली.