गणेशोत्सवात ‘डीजे’ला फाटा देत वृद्धाश्रमास ५० सहस्र रुपयांचे साहाय्य !
नाशिक येथील ‘बनात चाळ मित्रमंडळा’ची अभिनव कृती !
(‘डीजे’ (डिस्क जॉकी) एक व्यक्ती वेगवेगळ्या संगीतांचे मिश्रण करून त्याचे प्रसारण करतो.)
नाशिक – रेस्ट कँप रस्त्यावरील ‘बनात चाळ मित्रमंडळा’ने यंदा गणेशोत्सवात डीजे वा बँजो (तंतुवाद्य), मिरवणूक व्ययाला फाटा देत या रकमेतून पाथर्डी फाटा येथील ‘मानवसेवा केअर सेंटर’च्या वृद्धाश्रमाला ५० सहस्र रुपयांचे किराणा साहित्य भेट देत माणुसकी जोपासली. त्यांनी शहरातील देवळाली कँप पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांनी केलेल्या आवाहनाला अशा स्वरूपात प्रतिसाद दिला.
मंडळ पदाधिकार्यांनी वृद्धाश्रमाचे संचालक टी.एल्. नवसागर आणि ललिता नवसागर यांच्याकडे हे साहित्य सुपुर्द केले. या उपक्रमासाठी राजेंद्र कासट, सिमरन गिडवाणी, रॉबिन डेव्हिड, धर्मेंद्र मल यांच्यासह मंडळ सदस्यांचे योगदान लाभले.