५३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेला आणि उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला चिंचवड (पुणे) येथील चि. शिवांश सागर शेटे (वय २ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! चि. शिवांश सागर शेटे हा या पिढीतील एक आहे !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’  

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘भाद्रपद कृष्‍ण पंचमी (३.१०.२०२३) या दिवशी चिंचवड (पुणे) येथील चि. शिवांश सागर शेटे याचा द्वितीय वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याचे आई-वडील आणि आत्‍या यांना लक्षात आलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

चि. शिवांश सागर शेटे

याला द्वितीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !

१. गर्भारपण

सौ. स्नेहल शेटे

१ अ. रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात जाण्‍याची इच्‍छा होणे, शारीरिक अडचणींमुळे आश्रमात जाऊ न शकणे आणि नणंद कु. प्रेरिता धोतमल यांच्‍या माध्‍यमातून आश्रमातील प्रसाद मिळणे : ‘मला तिसरा मास चालू असतांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात जाण्‍याची पुष्‍कळ इच्‍छा झाली होती; परंतु मला असलेल्‍या शारीरिक अडचणींमुळे आधुनिक वैद्यांनी मला ‘प्रवास करू नका’, असे सांगितले होते. त्‍यामुळे मला आश्रमात जाणे शक्‍य नव्‍हते. त्‍या दिवसांत कु. प्रेरिता धोतमल (चि. शिवांशची आत्‍या) काही दिवस पुणे येथील आमच्‍या घरी आली होती. तिने येतांना आश्रमातील प्रसाद आणला होता. तेव्‍हा मला वाटले, ‘देवाने बाळाची इच्‍छा पूर्ण केली. मला आश्रमात जाता आले नाही, तरी प्रेरिताच्‍या माध्‍यमातून मला देवाचा प्रसाद मिळाला.’

१ आ. एकदा मला प्रसादाचा शिरा खाण्‍याची इच्‍छा झाली. त्‍या वेळी कोरोनामुळे संचारबंदी लागू होती. त्‍या परिस्‍थितीतही देवाच्‍या कृपेने मला कृष्‍णजन्‍माचा प्रसादाचा शिरा मिळाला.’

– सौ. स्नेहल शेटे (चि. शिवांशची आई), चिंचवड, पुणे

श्री. सागर शेटे

२. जन्‍मानंतर

२ अ. जन्‍म ते १ वर्ष

२ अ १. सर्वांशी जवळीक साधणे

अ. चि. शिवांश मामाच्‍या गावी असतांना आजोबांच्‍या समवेत प्रतिदिन गणपतीच्‍या मंदिरात जात असे. तेथे येणारे भाविक शिवांशशी बोलत असत. शिवांश त्‍या भाविकांचा लाडका होता.

आ. तो ९ मासांचा असतांना आम्‍ही त्‍याला घेऊन चिंचवड, पुणे येथे रहायला आलो. त्‍यानंतर अवघ्‍या ४ मासांतच त्‍याची आमच्‍या वसाहतीतील सर्व लोकांशी ओळख झाली.

२ अ २. परिस्‍थितीशी जुळवून घेणे : ‘शिवांशच्‍या जन्‍मानंतर तो पहिले ९ मास मामाच्‍या गावी राहिला होता. त्‍यानंतर पुणे येथे घरी आल्‍यानंतर ‘तो सर्व गोष्‍टींशी जुळवून घेतांना त्रास देईल का ?’, असे आम्‍हाला वाटले होते; मात्र त्‍याने जराही त्रास दिला नाही. त्‍याने पालटलेल्‍या परिस्‍थितीशी लगेच जुळवून घेतले.

२ अ ३. देवाप्रती भाव

अ. शिवांश प्रथमच पालथा झाला, तेव्‍हा तेथे ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ होता.  त्‍या वेळी ‘तो त्‍यांना नमस्‍कार करत आहे’, असे आम्‍हाला वाटले.

आ. शिवांशला ‘देवबाप्‍पा कुठे आहे ?’, असे विचारल्‍यावर तो देवघराकडे बोट दाखवतो. आम्‍ही नवीन ठिकाणी गेल्‍यावर त्‍याला ‘बाप्‍पा कुठे आहे ?’, असे विचारतो. तेव्‍हा तो लगेच त्‍या ठिकाणी असलेल्‍या देवघराकडे बोट करतो किंवा तेथे असलेल्‍या देवतांची चित्रे किंवा संतांची छायाचित्रे यांच्‍याकडे बोट दाखवतो. या पूर्वी तो कधीही त्‍या ठिकाणी गेेला नसतांनाही ‘तेथील देवघर कुठे आहे ?’, हे त्‍याच्‍या लक्षात येते. ‘हे  वैशिष्‍ट्यपूर्ण आहे’, असे आम्‍हाला वाटते.

इ. त्‍याने ‘स्‍वामी समर्थ आणि संत गजानन महाराज यांची छायाचित्रे पाहिली नसतांनाही ‘हे बाप्‍पा आहेत’, असे सांगून तो नमस्‍कार करतो.

ई. आम्‍ही बाहेर गेल्‍यावर मार्गात लहान मंदिरे दिसली की, तो लगेच नमस्‍कार करतो. काही वेळा आम्‍हालाही ‘येथे मंदिर आहे’, हे  ठाऊक नसते. तो ते आमच्‍या लक्षात आणून देतो.

२ अ ४. पायांवर डोके ठेवून नमस्‍कार करणे : २५.९.२०२२ या दिवशी त्‍याचा दिनांकानुसार पहिला वाढदिवस होता. त्‍या वेळी त्‍याला नवीन कपडे घातल्‍यावर त्‍याने माझ्‍या (श्री. सागर यांच्‍या) पायांवर डोके ठेवून नमस्‍कार केला. नंतर त्‍याने आईच्‍या (सौ. स्नेहल यांच्‍या) पायांवर डोके ठेवून नमस्‍कार केला. त्‍याला कुणीही पायांवर डोके ठेवून नमस्‍कार करायला शिकवले नव्‍हते.’

– सौ. स्नेहल शेटे (चि. शिवांशची आई) आणि श्री. सागर शेटे (चि. शिवांशचे वडील), चिंचवड, पुणे

२ आ. १ वर्षानंतर

२ आ १. सात्त्विक कृती करण्‍याची आवड : ‘तो धुपारती घेऊन सगळीकडे धूप दाखवतो आणि तुळशीच्‍या रोपाजवळ उदबत्ती लावतो. तो त्‍याच्‍या बाबांकडून अत्तर आणि कापूर यांचे उपाय करून घेतो.’ – सौ. स्नेहल शेटे

२ आ २. दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती भाव : ‘तो घरातील अन्‍य वृत्तपत्रे किंवा कागद यांवर लेखणीने (पेनने) रेघा ओढतो किंवा त्‍यांच्‍याशी खेळतो; मात्र तो दैनिक ‘सनातन प्रभात’शी खेळत नाही. तो १ वर्षाचा असल्‍यापासून दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात व्‍यवस्‍थित धरून त्‍याच्‍या भाषेत वाचून दाखवतो.

२ आ ३. देवाची आवड

अ. शिवांशची आई संध्‍याकाळी देवासमोर दिवा लावते. त्‍या वेळी तो देवाला आणि घरातील मोठ्या माणसांना नमस्‍कार करतो. त्‍याची आई स्‍तोत्र म्‍हणत असतांना तो मांडी घालून शांतपणे नमस्‍काराची मुद्रा करून बसतो.

आ. शिवांश खेळत असतांना पुष्‍कळ वेळा देवासमोर जाऊन आरती म्‍हणतो आणि नमस्‍कार करतो. तो एकटाच देवाशी बोलत असतो. त्‍या वेळी ‘सभोवताली कोण आहे ?’, याचे त्‍याला भान नसते’, असे माझ्‍या लक्षात आले.’

– कु. प्रेरिता धोतमल (शिवांशची आत्‍या)

इ. ‘एकदा चिंचवड येथे उज्‍जैन येथील लिंगायत संप्रदायाचे गुरु आले होते. त्‍या वेळी आम्‍ही त्‍यांच्‍या दर्शनासाठी गेलो होतो. तेथे त्‍यांचे एक शिष्‍य ‘शिवलिंगाची पूजा कशी करायची ?’, याविषयी सांगत होते. तेव्‍हा शिवांशने स्‍वतःच्‍या गळ्‍यातील शिवलिंग हातात घेऊन त्‍याची पूजा केली आणि शिवाचा नामजप केला. आम्‍ही त्‍या गुरूंच्‍या दर्शनाच्‍या वेळी जशी पूजा केली, तशी पूजा अनुमाने १० दिवसांनी शिवांशने केली आणि शिवाचा नामजप केला.

३. चि. शिवांशचे स्‍वभावदोष :

हट्टी आणि सांगितलेले न ऐकणे’

– सौ. स्नेहल शेटे

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १.९.२०२३)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.