सनातन प्रभात’मध्ये ‘डोळे येणे’ या विकारावर दिलेला नामजप केल्यावर डोळ्यांचा त्रास अल्प होणे
‘मे २०२३ मध्ये माझे डोळे आलेे होते. तेव्हा मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या सूचनेत दिल्यानुसार ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री हनुमते नम: । ॐ नम: शिवाय । ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप केला. नामजपाला आरंभ केल्यावर माझ्या डोळ्यांतून पाणी येणे आणि डोळे चुरचुरणे अल्प झाले अन् अर्ध्या घंट्याने ते बंद झाले.’
– श्री. विठ्ठल पाटील (वय ६४ वर्षे), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१३.९.२०२३)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |