सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून साधिकेचे सांत्वन करणे
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर डोकेदुखीचा त्रास न्यून होणे
‘एकदा माझे मन पुष्कळ अस्वस्थ झाले होते. त्यामुळे मी रडत होते. पुष्कळ रडल्याने मला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. माझे डोके जड झाले होते. तेव्हा मी प्रार्थना केली, ‘हे गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), कृपा करून माझ्या जवळ या. मला पुष्कळ दुःख होत आहे. माझे सांत्वन करा. मला झोप येत नाही.’ अशी प्रार्थना केल्यावर एका मिनिटात माझी डोकेदुखी न्यून झाली.
२. साधिकेची प्रार्थना ऐकून साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून येऊन तिचे सांत्वन करणे आणि हे साधना न करणार्या तिच्या बहिणीच्या लक्षात येणे
दुसर्या दिवशी सकाळी माझी मामे बहीण मला म्हणाली, ‘‘मला (मामे बहिणीला) एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात तू (अर्चना) पुष्कळ रडत आहेस. तुझ्या जवळ एक वयस्कर व्यक्ती येते. तिने पांढरा सदरा आणि पायजमा घातला आहे. तू (अर्चना) त्या व्यक्तीच्या मांडीवर झोपली आहेस. ती व्यक्ती तूला थोपटत आहे आणि नंतर तू झोपतेस.’’ मी माझ्या मामे बहिणीला विचारले, ‘‘तू सनातन संस्थेच्या गुरूंना पाहिले आहेस का ?’’ तेव्हा ती ‘नाही’, असे म्हणाली. मी तिला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवले. ते पाहून ती म्हणाली, ‘‘मला स्वप्नात दिसलेली व्यक्ती अशीच होती.’’ ते ऐकून मला पुष्कळ आनंद झाला; कारण या अज्ञानी जिवाची प्रार्थना ऐकून साक्षात् गुरुदेव सूक्ष्मातून माझे सांत्वन करायला आले होते. मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
गुरुदेव, आपण मला ही अनुभूती दिली आणि ती लिहून घेतली, यासाठी गुरुचरणी भावपूर्ण कृतज्ञता.’
– कु. अर्चना कुरुडेकर (वय २३ वर्षे), दावणगेरे, कर्नाटक. (४.७.२०२३)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |