नाशिक येथील संत पू. यशोदा गंगाधर नागरेआजी (वय ९५ वर्षे) यांचा देहत्याग !
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील चाडेगाव येथील संत पू. यशोदा गंगाधर नागरेआजी (वय ९५ वर्षे) यांनी २ ऑक्टोबर २०२३ या दिवशी त्यांच्या निवासस्थानी देहत्याग केला. वर्ष २०१८ मध्ये सनातन संस्थेचेे धर्मप्रचारक सद्गुुरु नंदकुमार जाधवकाका यांनी पू. नागरेआजींचा सन्मान करून त्या संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले होते.
सनातन संस्थेच्या नाशिक येथील साधिका सौ. सुनिता गीते यांच्या त्या आई होत्या. पू. आजींच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. २ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सतत देवाच्या अनुसंधानात असलेल्या पू. नागरेआजी !
‘सगळीकडे देव आहे’, असे पू. आजी सांगत असत. पू.आजी सदैव देवाच्या अनुसंधानात असत. त्यांच्या हातात कायम जपमाळ असे. सनातन संस्थेच्या साधकांवर आजींचे विशेष प्रेम होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर त्यांची श्रद्धा होती.