साम्यवादी नक्षलवादाच्या विरोधात ‘एन्.आय.ए.’ची आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांत ६० हून अधिक स्थानांवर धाड !
नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) साम्यवादी नक्षलवादी प्रकरणाच्या संदर्भात मोठी कारवाई केली आहे. यंत्रणेने आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांतील ६० हून अधिक स्थांनावर धाड टाकली असून आरोपींचा शोध घेण्यात आला. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘एन्.आय.ए.’ने राज्यातील पोलिसांसह २ ऑक्टोबरच्या सकाळपासून धाड घालण्याच्या कारवाईस आरंभ केला.
नक्सली मामले में एनआईए का एक्शन, आंध्र प्रदेश और तेलंगाना में 60 से ज्यादा जगहों पर की छापेमारी #NIARaids #AndhraPradesh #Telangana #India https://t.co/MlfAZIafgH
— ABP BIHAR (@abpbihar) October 2, 2023
ही धाडसत्रे त्या नेत्यांच्या घरात घालण्यात आले, ज्यांचे नक्षलवादाशी संबंध असल्याचे बोलले जाते. यांत तेलंगाणा राज्यातील भाग्यनगर, तर आंध्रप्रदेशातील गुंटूर, नेल्लोर आणि तिरुपति या जिल्ह्यांचा समावेश आहे. याआधी ९ सप्टेंबर या दिवशी ‘एन्.आय.ए.’ने अन्य एका प्रकरणात तेलंगाणा आणि छत्तीसगड राज्यांत अनेक ठिकाणी धाड टाकली होती.