शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती राममंदिर आंदोलनात मारल्या गेलेल्या कारसेवकांसाठी करणार श्राद्ध !

शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती

वाराणसी (उत्तरप्रदेश) – कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य शंकर विजयेंद्र सरस्वती सध्या येथे चातुर्मास व्रत महोत्सवासाठी आले आहेत. त्यानंतर ते अयोध्येसाठी प्रस्थान करणार आहेत. तेथे ते राममंदिर आंदोलनाच्या वेळी पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या कारसेवकांसाठी शांति अनुष्ठान आणि श्राद्ध घालणार आहेत. ते १० ऑक्टोबर या दिवशी अयोध्येसाठी जाणार असून तेथे २० दिवस रहाणार आहेत. ‘कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळावी’, यासाठी ते चतुर्दशीच्या दिवशी हे विधी करतील.

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना शंकराचार्य म्हणाले की, अयोध्या आणि कांची यांचा संबंध त्रेतायुगाशी आहे. सूर्यवंशी राजांची कुलगुरु कामाक्षी देवीच असून तिच्याच आशीर्वादाने राजा दशरथाला प्रभु श्रीरामचंद्र पुत्र रूपात प्राप्त झाले होते. ललितोपाख्यानात या प्रसंगाचे वर्णन आहे.

संपादकीय भूमिका 

आता यावरून धर्मनिरपेक्षतावादी म्हणजेच नतद्रष्ट हिंदूंकडून विरोध झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! गंमत अशी की, धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी एका बाजूला श्राद्धाला थोतांड म्हणतात, पण काहीही करून हिंदुत्वनिष्ठांना विरोध करण्यासाठी ते शंकराचार्यांनाही जाब विचारण्यास कमी करणार नाहीत, हेही तितकेच खरे !