नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘भगवा रक्षक’च्या कार्यकर्त्यांच्या प्रबोधनामुळे श्री गणेशमूर्तींचे १०० टक्के विसर्जन !
नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) – नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘भगवा रक्षक’ या संघटनेच्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन करणे हे धर्मशास्त्रानुसार कसे योग्य आहे ? या संदर्भात जागृती केली. कार्यकर्त्यांच्या प्रबोधनामुळे गावात यावर्षी १०० टक्के श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यात गावकर्यांनी सहकार्य केले. या कृतींमुळे भाविकांना विसर्जन करण्यासाठी साहाय्य झाल्यामुळे श्री गणेशभक्तांमध्ये मूर्ती विसर्जन केल्याचा आनंद मिळाल्यामुळे वातावरण सकारात्मक झाले. ‘हे सर्व श्री गणेशाच्या कृपेने झाले’, असे ‘भगवा रक्षक’च्या कार्यकर्त्यांनी सांगितले.