पुणे येथे ‘२० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करून देतो’, असे सांगून महिलेची फसवणूक !
पुणे – २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करून देतो, असे आमीष दाखवून २० लाख रुपयांची फसवणूक केली. तन्वीर पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंदस्वामी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी नारायण पेठेतील महिला व्यावसायिकेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.
१३ सप्टेंबर या दिवशी आरोपी तक्रारदार महिलेच्या घरी आले. रिकाम्या टाकीत २० लाख रुपये टाकण्यास सांगितले आणि खोलीत धूर केला. ‘हरिद्वार येथे विधी करावा लागेल’, असे त्यांनी सांगितले. नंतर आरोपी टाकीतील २० लाख रुपये घेऊन पसार झाले. (यातून हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते. – संपादक)