कोंढवा (पुणे) येथे ४ देशी गायी-बैल यांची कत्तलीसाठी वाहतूक करणार्या वाहनचालकावर गुन्हा नोंद !
पुणे – कोंढवा येथे २६ सप्टेंबर या दिवशी ४ देशी गायी आणि बैल यांची कत्तलीसाठी टेंपोमध्ये वाहतूक होणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार गोरक्षक मंगेश चिमकर, ओंकार जाधव, शादाब मुलाणी आणि निखिल दरेकर यांनी कात्रज चौकात भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या साहाय्याने टेंपो पकडला. टेंपोचालकाकडे विचारपूस केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी टेंपोचालक राजाराम दुपारगुडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि ‘संत जगद़्गुरु तुकाराम महाराज गोशाळा’, मावळ येथे गोवंश सुखरूप सोडण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिका :केवळ वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई करून दिवसरात्र होणार्या गोहत्या कधीच थांबणार नाहीत ! गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी सरकारने गोहत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशुवधगृहे बंद करावीत! |