थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करतांना महावितरणच्या २ महिला तंत्रज्ञांना ठेवले डांबून !
पुणे – महिला तंत्रज्ञ करुणा आढारी आणि रूपाली कुटे या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे शासकीय कर्तव्य करत होत्या. ललित बोदे आणि आरती बोदे यांच्या ५ सहस्रांहून अधिक रुपयांच्या थकबाकीमुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. ‘धनादेश न देता ऑनलाईन वीजदेयक भरा’, असे सांगितल्यावर बोदे यांनी दोघींना दरवाजा बंद करून इमारतीमध्येच अडकवले. त्यांच्यावर कुत्रीही सोडली. (चोर तो चोर वर शिरजोर ! अशा थकबाकीदारांना अधिक कठोर शिक्षा देणे आवश्यक ! – संपादक) महावितरणने ललित बोदे आणि आरती बोदे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.