सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भावपूर्ण प्रार्थना केल्यामुळे भाताची रोपे शेतासाठी पुरून त्यातून अन्य शेतकर्यांचीही भातलावणी होणे
१. शेती करतांना साक्षात् गुरुमाऊलींना डोळ्यांसमोर आणून भावपूर्ण प्रार्थना करून नामजप करत बियाणे पेरणे
‘निसर्गाचे स्वरूप पालटत आहे. त्यामुळे शेतकर्याला ‘शेती कशी करावी आणि काय करावे ?’, हेच कळेनासे झाले आहे. प्रतिवर्षी भाताचे बियाणे शेतामध्ये अधिकचे पेरले, तरी ते अल्पच पडायचे. गेल्या वर्षी मी नामजप करतच बियाणे पेरले; पण तरीही तेच झाले. यंदा मात्र मी बियाणे पेरतांना केवळ नामजप नाही, तर साक्षात् गुरुमाऊलींना माझ्या डोळ्यांसमोर आणून भावपूर्ण प्रार्थना केली, ‘हे शेतसुद्धा तुमचेच आहे आणि या शेतात बियाणे कसे पेरायचे ? आणि कसे नाही ?, हेसुद्धा गुरुमाऊली तुम्हीच ठरवा.’
२. साधनेसाठीचे प्रयत्न करून बियाणे पेरल्यामुळे भाताची रोपे चांगली येणे
भाताची रोपे श्रीकृष्णाचा नामजप करत लावली. माझ्या शेतातील भाताचे रोप इतके चांगले आले की, ते माझ्या शेताला पुरून उरले. उरलेल्या रोपांमध्ये आणखी चार शेतकर्यांची भाताची लावणी झाली. या वेळी भात लावणीला ओळखीच्या माणसांचेसुद्धा साहाय्य झाले आणि भात लावणी अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण झाली.
‘केवळ गुरुमाऊलींनी त्यांचे चरणकमल सदैव आमच्या मस्तकावर ठेवावेत’, अशी त्यांच्या कोमल चरणी प्रार्थना करते आणि त्यांच्या चरणांशी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मनीषा विजय गव्हाणे, आळंदेवाडी, भोर, पुणे. (२९.८.२०२३)
३. धर्मशिक्षणवर्गात अनुभूती वाचून दाखवल्यावर उपस्थित महिलांची भावजागृती होणे आणि त्यांनीही त्यांच्याकडून असेच प्रयत्न होत असून पिके चांगली येत असल्याची अनुभूती आल्याचे सांगणे
‘सौ. मनीषा गव्हाणे यांची पिकांसंदर्भातील अनुभूती आळंदे येथील गावातील धर्मशिक्षणवर्गात वाचून दाखवली. ही अनुभूती वाचताच वर्गातील सर्व महिलांचा भाव जागृत झाला आणि त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. वर्गातील सर्व वातावरण भावमय झाले. सर्वजण स्तब्ध झाले होते. सर्वांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही सर्वजण शेतातील कामे करतांना अशीच प्रार्थना आणि नामजप करतच करतो. शेतात सतत नामजप होत असतो. त्यामुळे आमची पिकेसुद्धा पूर्वीपेक्षा चांगली येत आहेत.’’
– श्री. महेंद्र अहिरे, आळंदे, भोर, पुणे.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |