म. गांधी यांचे काँग्रेसविषयी द्रष्टेपण !
आज ‘गांधी जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
१. जेव्हा काँग्रेसच्या नैतिक प्रभावाचे स्थान गुंडगिरी घेईल, तेव्हा तिचा स्वाभाविक मृत्यू होईल आणि ते योग्य होईल.
(संदर्भ : मासिक ‘हरी’, १८ जून १९३८, पृष्ठ १४९)
२. काँग्रेसमध्ये पसरलेली घाण दूर करण्याकरता केवळ संकल्पाची आवश्यकता आहे; परंतु काँग्रेसच्या समित्यांचे सदस्य अहंमन्य आणि उदासीन राहिले, तर भ्रष्टाचाराचा सामना करणे कठीण जाईल. जेव्हा मिठाची चव निघून जाते, तेव्हा चवीकरता कोणते मीठ टाकणार ?
(संदर्भ : मासिक ‘हरी’, २२ ऑक्टोबर १९३८, पृष्ठ २९९)
३. रोमचा र्हास त्याच्या पतनाच्या आधीच चालू झाला होता. अशाच रितीने काँग्रेसचे पोषण गत ५० पेक्षा अधिक वर्षांपासून देशातील सर्वोत्कृष्ट बुद्धीमत्तेने केले आहे, तिचा र्हास चालू होताच ती एकदम तुटून जाईल; परंतु वेळ येताच भ्रष्टाचारावर उपाय करण्यात आला, तर काँग्रेस तुटण्याची वेळ मुळीच येणार नाही.
(संदर्भ : मासिक ‘हरी’, २८ जानेवारी १९३९, पृष्ठ ४४४)
४. सत्ता मिळाल्याबरोबर काँग्रेसच्या लोकांना ‘सर्वकाही आपलेच आहे’, असे वाटू लागले. एका अर्थाने हे योग्यच आहे; परंतु याचा अर्थ असा नाही की, आपला शिस्तीशी काहीही संबंध नाही. शिस्त आणि विनम्रता काँग्रेसच्या लोकांकरता गौरवाची गोष्ट असली पाहिजे.
(संदर्भ : मासिक ‘हरी’, १ जून १९४७, पृष्ठ १७६)
५. ‘…लोकशाहीच्या कठीण चढणीच्या कालावधीत तिने अपरिहार्यपणे भ्रष्टाचाराचे असे काही खड्डे खोदलेले आहेत आणि अशा काही संस्था निर्माण केल्या आहेत की, ज्या केवळ नावापुरत्या लोकप्रिय अन् लोकशाहीवादी आहेत. या काट्या-कुट्याने भरलेल्या आणि आडव्या तिडव्या पसरलेल्या जंजाळातून मार्ग कसा काढायचा.’
‘…अजूनही बर्याच व्यक्ती आणि पक्ष मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील, ‘ज्याचेकार्य सर्वोत्तम असेल, तोच त्यांचे हृदय जिंकेल’, हाच एक असा उपाय आहे की, ज्यामुळे काँग्रेस देशातील आपली प्रतिष्ठापरत मिळवू शकेल, जर ती सत्तेच्या घाणेरड्या आदळाआपट करण्यात गुंतली, तर एक दिवस तिचे अस्तित्व संपलेले आढळेल. ईश्वराचे आभार की, आता राजकीय क्षेत्रात काँग्रेस एकमेव पक्ष नाही.’’
(संदर्भ : ‘हरी’ १ फेब्रुवारी १९४८, पृष्ठ ४)
(या लेखात म. गांधी यांनी काँग्रेसच्या गलिच्छ कारभाराविषयी व्यक्त केलेली तत्कालीन मते आजही लागू पडत आहेत. म. गांधी यांच्या तत्त्वांना तिलांजली देणारी आजची काँग्रेस आणि काँग्रेसवाले याविषयी आत्मचिंतन करतील का ? याविषयी काही बोलतील का ? – संपादक)
(श्री. चंद्रकांत साने यांच्या ‘फेसबुक’वरून साभार)