देवतांची चित्रे फाडली, देशविरोधी घोषणा देण्यास भाग पाडले !
झाशीतील हिंदु विद्यार्थ्यांवर काश्मीरमधील मुसलमान विद्यार्थ्यांनाकडून अत्याचार !
झाशी (उत्तरप्रदेश) – येथील बरुआसागर नवोदय विद्यालयाचे २० हिंदु विद्यार्थी काश्मीरमधील राजौरी नवोदय विद्यालयात शिकण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना मारहाण करण्यात आल्यावर बरुआसागर नवोदय विद्यालयातील काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांना स्थानिक विद्यार्थ्यांनी चोपले होते. तसेच राजौरीतील विद्यार्थ्यांना माघारी बोलावण्यासाठी आंदोलन केले. यानंतर दोन्हींकडील विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठवण्यात आले. राजौरी येथे गेलेले झाशीतील विद्यार्थी येथे परतल्यावर त्यांनी ‘त्यांच्यावर राजौरी येथे कसे अत्याचार करण्यात आले ?’, याची त्यांनी माहिती दिली. तेथील काश्मिरी विद्यार्थ्यांनी या हिंदु विद्यार्थ्यांकडून भारतविरोधी घोषणाबाजी करायला भाग पाडले, देवतांची चित्र फाडली, अशी माहिती दिली.
उष्टी भांडी घासण्यास लावली !
दीपक कुमार या विद्यार्थ्याने माहिती देतांना सांगितले की, येथील काश्मिरी विद्यार्थी लहान लहान गोष्टींवरून त्रास देत होते. आम्हाला घेराव घालून देशविरोधी घोषणाबाजी करण्यास भाग पाडत होते. घोषणा न दिल्यास मारहाण केली जात होती. इतकेच नाही, तर उष्टी भांडी धुवायला लावत होते. शिक्षकांकडे याविषयी तक्रार केल्यावरही ते ऐकत नव्हते. आम्ही याची माहिती घरी कळवली नाही; कारण यामुळे कुटुंबियांना त्रास होईल.
मनगटावर दोरा बांधल्याने हात तोडला !
विपुल कुमार याने सांगितले की, आम्ही वसतीगृहातील आमच्या खोलीमध्ये देवतेचे चित्र लावल्यावर ते फाडण्यात येत होते. माझ्या समवेतचा विद्यार्थी ऋतिक याने मनगटावर लाल दोरा बांधल्याने त्याने पुन्हा हातावर लाल दोरा बांधू नये म्हणून त्याचा हातावर मारून अस्थिभंग करण्यात आला.
संपादकीय भूमिका
|