लंडनमध्ये भारतीय वंशाच्या खलिस्तानविरोधी शीख व्यक्तीला ठार मारण्याच्या धमक्या !
|
लंडन (ब्रिटन) – येथे खलिस्तानविरोधी शीख व्यावसायिक हरमनसिंह कपूर यांना खलिस्तान्यांनी धमकी देत त्यांच्या वाहनावर गोळीबार केल्याची घटना ३० सप्टेंबरला त्यांच्या घराबाहेर घडली. हरमनसिंह यांना अनेक मासांपासून खलिस्तान्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत; मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हरमनसिंह लंडनमध्ये एक उपाहारगृह चालवतात.
खालिस्तानी चरमपंथियों ने ब्रिटेन में एक और बड़ी घटना को अंजाम दिया है. खालिस्तानी चरमपंथियों ने लंदन में एक सिख रेस्तरा मालिक पर हमला किया है#Khalistan #Khalistani #London #UK #KhalistaniTerrorist #HarmanSinghKapoor pic.twitter.com/1kZlbGyPqL
— Sahara Samay Live (@SaharaSamayNews) October 1, 2023
हरमनसिंह यांनी सांगितले की, गेल्या ८ मासांत त्यांच्यावर ४ वेळा आक्रमण करण्यात आले आहे. आताच्या घटनेत त्यांच्या घराबाहेर उभ्या असणार्या त्यांच्या गाडीवर गोळीबार करून त्याच्यावर लाल रंग ओतण्यात आला. या वेळी खलिस्तान्यांनी शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली आणि ते पळून गेले.
खलिस्तान्यांनी हरमन सिंह यांच्या पत्नी आणि मुलगी यांच्यावर बलात्कार करण्याचीही धमकी दिली आहे. ‘याविषयी पोलिसांना माहिती दिली असूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही’, असे हरमनसिंह यांनी सांगितले.
United Kingdom | Harman Singh Kapoor and Khushi Kaur allege they were harassed by the Khalistanis when they spoke against them and the police has not protected them enough to feel safe.#ReporterDiary #News #London (@loveenatandon ) pic.twitter.com/iAcqRuKK9M
— IndiaToday (@IndiaToday) May 2, 2023
मरेपर्यंत खलिस्तानचा विरोध करू आणि भारतासमवेत राहू ! – हरमनसिंह दांपत्य
हरमन सिंह आणि त्यांची पत्नी खुशी यांनी सांगितले की, आम्ही मरेपर्यंत खलिस्तानचा विरोध करत राहू. खलिस्तानी सर्व शिखांना अपकीर्त करत आहेत. खलिस्तानची मागणी चुकीची आहे. शिखांच्या गुरूंनी धर्मासाठी बलीदान दिले आहे. त्याची खलिस्तान्यांना जाण नाही.
“खालिस्तान समर्थकों ने मेरी कार पर फायरिंग की..”
◆ लंदन में एक सिख रेस्तरां मालिक हरमन सिंह कपूर का दावा
◆ इन दावों पर अभी तक लंदन पुलिस का कोई बयान नहीं आया#London | #HarmanSinghKapoor | #Khalistani pic.twitter.com/JlTnpGfLc9
— News24 (@news24tvchannel) October 1, 2023
संपादकीय भूमिका
|