खलिस्तानी कॅनडामध्ये भारताविरुद्ध मोर्चा काढणार !
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येवरून वाद चालू असतांना ज्या गुरुद्वाराजवळ निज्जर याची हत्या झाली, तेथे खलिस्तानी भारताच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. यासाठी या मोर्च्याच्या आयोजकांनी संपूर्ण कॅनडातील खलिस्तान्यांना आमंत्रित केले आहे. आयोजकांनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रात म्हटले आहे की, कॅनडात भारतियांना भेडसावत असलेला हिंसाचार आणि धोका यांवर चर्चा केली जाईल. भारताविरुद्ध पुढील रणनीती सिद्ध करण्यात येईल.
सौजन्य न्यूज 18 इंग्लिश
हिंसाचाराच्या विरोधात भारताला आवाज उठवावा लागेल !
या संदर्भात भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्.जयशंकर म्हणाले की, कॅनडात भारताच्या विरोधात घडणार्या घटनांना ‘सामान्य’ समजले जाऊ शकत नाहीत. परदेशात खलिस्तानी आतंकवादी ज्या प्रकारे भारतीय अधिकार्यांच्या विरोधात हिंसाचार करत आहेत, त्याविरोधात आवाज उठवावा लागेल.
संपादकीय भूमिकायातून लक्षात येते की, कॅनडातील सरकार खलिस्तान्यांना अद्यापही मोकळीकच देत आहे. भारताने आता कॅनडावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घ्यावा ! |