हिंदु देवतांच्या मूर्ती आणि छायाचित्रे यांची विटंबना विहिंपच्या कार्यकर्त्यांनी रोखली !
सांताक्रूझ येथील चक्कीखाण परिसरातील घटना !
मुंबई – सांताक्रूझ उपनगरातील चक्कीखाण परिसराजवळील पिंपळाच्या झाडाखाली हिंदु देवतांच्या खंडित अवस्थेतील मूर्ती आणि छायाचित्रे फेकण्यात आली होती. तेथे प्रतिदिन स्वच्छता होते; पण या मूर्ती आणि छायाचित्रे यांना कुणीही हात लावला नाही. विश्व हिंदु परिषद (बजरंग दल) च्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्वच्छता करून मूर्ती आणि छायाचित्रे यांची होणारी विटंबना थांबवली. या वेळी राकेश शुक्ल, अंकित, नितीन, सोनू, विहिंपचे प्रखंड कोषाध्यक्ष निखिल, वीर शुक्ल, नीलम दुबे आदी उपस्थित होत्या.
संपादकीय भूमिका :सतर्क आणि धर्मप्रेमी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! |