गोवा : केरी तपासणी नाक्यावर ११ लाख रुपये किमतीचे गोमांस कह्यात
‘केसरिया हिंदु वाहिनी’चे राजीव झा यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांची कारवाई
पणजी, ३० सप्टेंबर (वार्ता.) : वाळपई पोलिसांनी बेळगाव येथून गोव्यात येणार्या गोमांस वाहतुकीवर २९ सप्टेंबरच्या रात्री ३.३० वाजता कारवाई केली. गोमांस घेऊन टाटा योद्धा बनावटीचे चारचाकी वाहन (टेंपो) (जीए ०९ यु ६३५२) केरी तपासणी नाक्यावर आला असता पोलिसांनी कारवाई केली.
बेळगाव येथून गोव्याच्या दिशेने गोमांसाची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती ‘केसरिया हिंदु वाहिनी’चे पदाधिकारी श्री. राजीव झा यांना मिळाली होती. श्री. राजीव झा यांनी ही माहिती पोलिसांनी दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सय्यद इस्माईल मरचोनी (रहाणारा पेडणे) याला कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या गोमांसाची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे. वाळपई पोलिसांनी कह्यात घेतलेल्या गोमांसाचा पंचनामा करून पशूवैद्यांकडून अहवाल मागवला आहे.
संपादकीय भूमिका
गोरक्षकांना मिळते ती माहिती पोलिसांना मिळत नाही का ? |