‘एक तारीख एक तास’ स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
आजपासून राज्यभर मोहीम !
मुंबई – स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या १ ऑक्टोबर या दिवशी राबवण्यात येणार्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
‘एक तारीख एक तास’ उपक्रमात सहभागी व्हा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहनhttps://t.co/hfmAtQcSWO#EknathShinde #CleanlinessCampaign
— Deshdoot (@deshdoot) October 1, 2023
‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत १ ऑक्टोबर या दिवशी राज्यात सर्वत्र नागरी, तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमांतर्गत प्रत्येकजण जेथे कुठे असेल, तेथे स्वच्छता करून या अभियानात सहभाग नोंदवू शकणार आहे. गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक प्रभागात सकाळी १० वाजल्यापासून या मोहिमेचा प्रारंभ होईल. यात सफाई मित्रही सहभागी होतील. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारी विशेष शिबिरे-प्रदर्शने आयोजित केली जातील.
संपादकीय भूमिका :‘एक तारीख एक तास’ स्वच्छता अभियानाद्वारे सर्वांनीस्वत:वर स्वच्छतेचा संस्कार करून घेणे देशासाठी हितावह ! |