‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन कार्यासाठी लागणार्या भारतीय आणि विदेशी वाद्यांची दुरुस्ती करता येणार्यांसाठी सेवेची सुसंधी !
वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना आवाहन !
‘१४ विद्या आणि ६४ कला, म्हणजे हिंदु धर्माने विश्वाला साधनेच्या संदर्भात दिलेली अनमोल देणगी ! या विद्या आणि कला मानवाला आंतरिक सुख, समाधान अन् ऐहिक उत्कर्ष प्राप्त करून देतात, तसेच त्यांच्या माध्यमातून साधना करून कलावंताला ईश्वरप्राप्ती करता येते.
‘जनमानसात भारतीय संगीताचे महत्त्व बिंबवणे’, हा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चा व्यापक उद्देश आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत, तसेच भारतीय नृत्य अन् पाश्चात्य नृत्य यांचे तुलनात्मकदृष्ट्या होणारे परिणाम’, या संदर्भात संशोधन केले जात आहे. आतापर्यंत गायन, वादन आणि नृत्य यांसंदर्भातील ७०० हून अधिक संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले आहेत.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत घेण्यात येणार्या या प्रयोगांसाठी ‘बासरी, सतार, तबला, पेटी (हार्मोनियम), तानपुरा’, या भारतीय, तसेच ‘गिटार, व्हायोलिन, मेंडोलीन, सिंथेसाईजर’, अशा विदेशी वाद्यांचा उपयोग केला जातोे.
या अनुषंगाने वाद्यांची दुरुस्ती करता येणार्यांची आवश्यकता आहे. जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वाद्यांची दुरुस्ती विनामूल्य करून देऊ शकतात, त्यांनी पुढील पत्त्यावर संपर्क करावा.
नाव आणि संपर्क क्रमांक : श्री. अभिजित सावंत – ८७९३६७८१७८
संगणकीय पत्ता : contact४mav@gmail.com
टपालासाठी पत्ता : श्री. अभिजीत सावंत, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.’