परकीय आक्रमकांचा पराकोटीचा हिंदु धर्मद्वेष जाणा !
१. औरंगजेबाने तर कहरच केला. जिथे कुठे हिंदूंचे ग्रंथ होते, तिथे आपल्या लोकांना पाठवून ते जाळण्याचे दायित्व देऊन ते पार पाडले. जे कुणी हे काम अधिक तत्परतेने करत असे, त्याला तो बक्षीस देत असे.
२. गोरे पाय आपल्या देशाला लागले आणि वैदिक वाङ्मयाच्या भाषांतराच्या नावावर त्याला विकृत करणे चालू झाले. या पुढील पायरी, म्हणजे ते विकृतपणे भाषांतरित केलेले वाङ्मय अधिकृतपणे जगभरात प्रसारित करण्यात आले. त्यानंतर भारतातील पुढच्या पिढ्यांना हेच विकृत वाङ्मय शिकवण्याचे काम शाळांमध्ये चालू झाले.
३. नालंदा, अवंतीपुरी येथील विशाल ग्रंथालये क्रूरकर्मा सुलतान बखत्यार खिलजीचा सेनापती महंमद विशान याने जाळून खाक केली. अल्लाउद्दीन खिलजीने अन्हिलवाडा आणि पट्टणची येथील ग्रंथसंपदा आगीच्या उदरात ओतली. सर्वच्या सर्व ग्रंथांची राख झाल्याची निश्चिती झाल्यावरच त्याने ते स्थळ सोडले.
आज जी काही ग्रंथसंपदा आपल्याजवळ उरली आहे, तिचे प्राणपणाने जतन करणे आणि परंपरेप्रमाणेच अर्थ लावून समजावून घेणे, हेच महत्त्वाचे आहे.
४. विध्वंसाचे काही विलक्षण पुरावे सांगायचे झाले, तर महंमद गझनीने गुजरातमधील सोमनाथ मंदिर तोडले, फोडले, मोडले. त्याच्या रक्षणासाठी असलेल्या ८० सहस्र हिंदु धर्मविरांचे मुडदे पाडले. एवढ्याने त्याचे समाधान झाले नाही, तर त्याने तेथील अतिभव्य आणि प्रचंड ग्रंथालय पेटवून दिले. त्या ग्रंथालयाची आग ६ मास सतत जळत होती.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, जुलै २०२१)