नाशिक येथे जनजागृतीमुळे भाविकांकडून श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन !
सकल हिंदु समाजाच्या प्रयत्नांना यश !
नाशिक – येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने नाशिक पंचवटी येथील लक्ष्मीनारायण घाटावर श्री गणेशमूर्ती विसर्जन वहात्या पाण्यात करण्याचे आवाहन करण्यात आले होते. हातात फलक धरून जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी सकल हिंदु समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी भाविकांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला. जनजागृतीचे फलक वाचून भाविकांनी वहात्या पाण्यात विसर्जन केले. श्री गणेशमूर्ती दान करणे हा ऐच्छिक भाग असून त्याची सक्ती नसल्याचे समजल्यावर भाविकांनी वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचा निर्धार केला.