ओढ्याचे पाणी न्यून झाल्याने बाहेर आलेल्या श्री गणेशमूर्तींचे श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने पुनर्विसर्जन !
निपाणी (कर्नाटक) – निपाणी तालुक्यातील शिरगुप्पी आणि पंगीरे परिसरांतील काही भाविकांनी शिरगुप्पी येथील ओढ्यामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते. यातील पाणी न्यून झाल्यावर काही मूर्ती बाहेर आल्या होत्या. ही घटना श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी बाहेर आलेल्या श्री गणेशमूर्ती एकत्र करून त्या विधीपूर्वक पुनर्विसर्जित केल्या. (शास्त्रानुसार कृती करणार्या श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! – संपादक) या उपक्रमात श्रीराम सेना हिंदुस्थानचे सर्वश्री श्रेयश आंबले, नीलेश शेलार, प्रशांत खराडे, अनिकेत कोळकी, साईनाथ चिकोडे, विपुल सुतार, ओंकार बेडगे यांसह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.