आनंदी रहाण्याचे महत्त्व छोट्या प्रसंगातून शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
एकदा रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील एक साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत एका सेवेसाठी गेला होता. पूर्वी तो साधक काही सेवांसाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत जात असे. कालांतराने त्याची सेवा पालटली, त्यामुळे त्याचे त्यांच्याकडे जाणे बंद झाले होते. या वेळी तो साधक परात्पर गुरुदेवांकडे गेला. तेव्हा तो आनंदी दिसत नव्हता. त्याचा चेहरा गंभीर झाला होता. त्याच्या समवेत आणखीही २ साधक होते. त्यांची सेवा संपल्यावर परात्पर गुरुदेव त्या साधकांना म्हणाले, ‘‘याला जरा हसवा. हसत नसेल, तर विनोद सांगून हसवा.’’ तेव्हा मला आनंदी रहाण्याचे महत्त्व परात्पर गुरुदेवांच्या बोलण्यातून जाणवले. मनमोकळेपणे बोलून मनावरील ताण हलका करणे आणि पर्यायाने आनंदी रहाणे महत्त्वाचे आहे. परात्पर गुरुदेवांना त्या साधकाच्या आनंदी रहाण्याची काळजी होती; म्हणून त्यांनी त्या साधकाला विनोद सांगून हसवायला सांगितले. हसल्याने मनावरील न्यून होतो आणि उत्साह वाढून सेवाही चांगली होते, तसेच साधकांमध्ये सुसंवाद साधणेही शक्य होते. परात्पर गुरुदेवांनी या छोट्याशा कृतीतून आनंदी रहाण्याचे महत्त्व विशद केले. ‘साधक आनंदी आणि हसत रहावा, यासाठी ते किती प्रयत्नशील असतात’, हेही यावरून शिकायला मिळते. त्यासाठी आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’
परमसुंदर ज्ञान दिधले गुरुदेवांनी ।
आनंदप्राप्ती हे जीवनाचे ध्येय सांगूनी ॥ १ ॥
साधक रहावेत आनंदी अन् उत्साही ।
म्हणूनी करती ते गमतीजमतीही ॥ २ ॥
साधकांचा आनंद हाच त्यांचा आनंद ।
जीवनाचे मर्म सांगूनी साधकांसी देती परमानंद ॥ ३ ॥
अष्टांग साधना सांगितली साधकांस ।
जेणेकरूनी होवो आनंदप्राप्ती जलद त्यांस ॥ ४ ॥
ऐसे सद़्गुरु लाभले जीवनी आम्हांस ।
भाग्य थोर लाभला परिसस्पर्श तयांचा साधकांस ॥ ५ ॥
कृतज्ञ तुमच्या चरणी गुरुदेव ।
थोरवी तुमची न कळे आम्हां पामरांस ॥ ६ ॥
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.९.२०२३)