पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांकडून भारताचा ‘शत्रू देश’ असा उल्लेख !
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानी क्रिकेट संघ भाग्यनगर येथे पोचल्यावर उत्साहात स्वागत !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानी क्रिकेट संघ भारतात पोचला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख झका अश्रफ यांनी भारताचा ‘शत्रू देश’ असा उल्लेख केला आहे.
(सौजन्य – इंडिया टूडे)
झका अश्रफ पाकिस्तानी खेळाडूंच्या वाढलेल्या वेतनाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, आम्ही खेळाडूंना इतके पैसे दिले आहेत, कदाचित् इतिहासात खेळाडूंना इतके पैसे कधीच मिळाले नसतील. ‘आमच्या खेळाडूंचे मनोबल उंचावले पाहिजे’, हाच माझा उद्देश होता. ते कोणत्याही शत्रू देशात किंवा स्पर्धा आयोजित केलेल्या कोणत्याही ठिकाणी गेल्यास त्यांना चांगली कामगिरी करता यावी, यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.
पाकिस्तान संघाला भाग्यनगर (हैद्राबाद) आणि कर्णावती (अहमदाबाद) येथील मुसलमानांचे समर्थन मिळणार ! – पाकचे माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदविश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी संघाविषयी पाकमधील ‘समा टीव्ही’ या वृत्तवाहिनीवरील चर्चेत पाकचे माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमद म्हणाले की, हैद्राबाद आणि अहमदाबाद येथे मुसलमानांची संख्या अधिक आहे. तेथे आपल्या संघाला भरपूर समर्थन मिळेल. (पाकिस्तानचे भारतातील कोणती लोक समर्थन करतात, हे यातून पुन्हा एकदा उघड होते ! याविषयी देशातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक) |
संपादकीय भूमिका
|