नाशिक येथे जलनिःस्सारणाचे २० वर्षांचे काम एका दिवसात मार्गी !
नागरिकांनी रात्री आंदोलन केल्यानंतर अधिकारी झोपेतून जागे !
नाशिक – शहरातील सिडको येथील उपेंद्रनगरच्या साईग्राम आणि परिसरातील घरांमध्ये स्नानगृह अन् जलनिःस्सारण यांचे पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. वारंवार तक्रारी करूनही त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी २५ सप्टेंबरच्या रात्री मोर्चा काढत सिडको विभागीय कार्यालयात रात्री विलंबापर्यंत ठिय्या आंदोलन केले. ‘प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही’, अशी भूमिका घेतल्याने अधिकार्यांनी मध्यरात्रीच कामाला प्रारंभ करून हा प्रश्न मार्गी लावला. या भागातील अनेक विकासकामे गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यापैकीच एक जलनिःस्सारणाचे काम असल्याचे नागरिकांनी सांगितले. ‘कामे होऊ शकतात; पण अधिकार्यांची इच्छाशक्ती नसते, त्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे’, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.
संपादकीय भूमिका
|